बघू नको सारखी अशी,प्रेमात पडेन तुझ्या.
हसू नकोस गं खळखळून अशी,प्रेमात पडेन तुझ्या.
केस मोकळे सोडताच, भासेस जशी परी तू,
बांधूनच ठेव त्यांना,प्रेमात पडेन तुझ्या.
वाटतं मलाही, सतत जवळ असावीस तू,
नको..........लांबच बस थोडी,प्रेमात पडेन तुझ्या.
पाहताच लाजून चूर, होऊ नकोस अशी,
सावर स्वतःला जरा,प्रेमात पडेन तुझ्या.
कधीतरी हातात हात घेऊन,तुही म्हण मला,
पुरे या कविता रिशी,
प्रेमात पडेन तुझ्या!!
i am in love with this,,,, sach me...every word is true. just tat.. i dont know whom to say this for...
ReplyDeletethanks mithil. and wait for some time. you will surely find someone who will really love u a lot.take care bro
ReplyDeleteawesome
ReplyDelete