Wednesday, September 29, 2010

चल जीव देऊया!

आला कंटाळ या जीवनाचा,
चल जीव देऊया!
भोगले दुःख या पृथ्वीवरचे,
आता स्वर्गात काय ते पाहूया,
                          चल जीव देऊया.
मृत्यूचे करुया स्वागत,
देऊनी एक हास्य,
मृत होवून जाणू,
मृत्यूचे रहस्य,
थोड्यावेळ चितेच्या,
अग्नीमध्ये जळूया,
        चल,जीव देऊया.


मोक्ष मिळेल की नाही माहीत नाही,
नाही मिळालं तरी,
आपल्या बा चं का जातं काही?
आपण आपलं असच भटकत राहूया,
                           चल जीव देऊया!
                     भोगले दुःख या पृथ्वीवरचे,
                          आता प्रेमाच्या जगात राहूया,
                                        चल जीव देऊया!


              

Friday, September 24, 2010

प्रेमात पडेन तुझ्या!

बघू नको सारखी अशी,प्रेमात पडेन तुझ्या.
हसू नकोस गं खळखळून अशी,प्रेमात पडेन तुझ्या.
  
 केस मोकळे सोडताच, भासेस जशी परी तू,
   बांधूनच ठेव त्यांना,प्रेमात पडेन तुझ्या.

  वाटतं  मलाही, सतत जवळ असावीस तू,
     नको..........लांबच बस थोडी,प्रेमात पडेन तुझ्या.

   पाहताच  लाजून चूर, होऊ नकोस अशी,
     सावर स्वतःला जरा,प्रेमात पडेन तुझ्या.
      
   कधीतरी हातात हात घेऊन,तुही  म्हण मला,
        पुरे या कविता रिशी,
                    प्रेमात पडेन तुझ्या!!



माझ्या मनाच्या कोणी आस पास नाही!

आता मनी कोणाच्या,माझा वास नाही,
माझ्या ही मनाच्या कोणी आस-पास नाही.

बाजार जरी प्रेमाचा,
मांडला कोणी कितीही,
या बाजारी वस्तूंचा, मला हव्यास नाही,
माझ्याही मनाच्या कोणी आस-पास नाही.
चेहऱ्यावर स्मित त्यांच्या, पाषण हृदय त्यांचे.
प्रेमात ठेच खाऊन, मी ही उदास नाही,
माझ्याही मनाच्या कोणी आस-पास नाही.

दोष माझ्या आसवांचे, देऊ कसा कोणा मी?
या नाटकी चेहऱ्यांचा, मलाच अभ्यास नाही.
माझ्याही मनाच्या कोणी आस-पास नाही....कोणीच नाही!!

Tuesday, September 21, 2010

भेट तुझी माझी!

श्रावणातही श्रावण,

जेव्हा भेट तुझी माझी.

भासे नभ गुलाबी मनास,

घेई भरारी खगाची.

मी पाहणे तुजकडे,

तू हळूच लाजणे.

मग मिठीत मी घेणे,

मज तमा न जनाची,

श्रावणातही श्रावण जेव्हा भेट तुझी माझी.

धुंद होऊनी मिठीत,

जन्मोजन्मी राहणे,

न मी या जगाचा,

न तू या जगाची!

श्रावणातही श्रावण जेव्हा भेट तुझी माझी!

आता कुठे ...............

आता कुठे प्रेमाची,काळी उमलत होती,
आता कुठे गालावर खळी नकळत होती.

चहुकडे दरवळला होतं सुगंध तिचा,
मातीचा गंध फिका,फुलंही जळत होती,
आता कुठे गालावर खळी नकळत होती.

अलगदसा स्पर्श माझा, झाला देहास तिच्या,
चिंब लाजून ती,दूर पळत होती,
आता कुठे गालावर खळी नकळत होती.

नकळतच श्वासात श्वास मिसळत होते,
गुलाबी त्या वाटेकडे,तीही वळत होती,
आता कुठे गालावर खळी नकळत होती.

पाहून डोळ्यात माझ्या,तिने अर्पिले सर्व काही,
चांदन्यांची रात्र ती, दोघांना छळत होती,
आता कुठे..............

शब्द

कुठे माझ्या प्रियेला,
कळतात शब्द माझे?
म्हणूनच दूर ,
तिच्यापासून पळतात शब्द माझे.
कधी वाटतो,हा अबोलाच बरा बरासा,
नाहीतर मग उगाच मला, छळतात शब्द माझे




 .