Saturday, May 29, 2010

मी

मिठीत तिच्या मी निवांत निजलो होतो,
उघडले जेव्हा डोळे.रस्त्यावर बेवारस पडलो होतो.
घडले असे कसे का?मलाच कळले नाही,
नाशिबशीही कधीतरी,बहुतेक मी नडलो होतो.
सगळे निघून गेले,आपआपल्या वाटेवर,
मी मात्र जुन्या, आठवनीनवरच अडलो होतो.
आयुष्यभर भिजवले डोळे,
उमगलं नाही मला,
अश्रू फक्त पाणी माझे, मी उगाच रडलो होतो.
समजून घेतले नाही, कोणी कधी मला,
माझं मला मी तरी, कुठे उलगडलो होतो!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

2 comments:

  1. are yar.. hech marathi font madhe lihayache hote na..
    mithil

    ReplyDelete
  2. मिथिल-मराठीत काही तांत्रिक अडचणीनमुळे लिहू शकलो नव्हतो. हो,पण यापुढे प्रत्येक कविता मराठीतच लिहिली जाईल.
    हार्दिक आभार,
    रिशी.

    ReplyDelete