या बेरकी जगाशी,
माझा काहीच संबंध नाही.
मी लहरी उनाड वारा,
मी जेरबंद नाही!
म्हस्णात गेली नियमं तुमची,
जाळून टाका रिती!
ही असली थेरं पाळायला,
मी लहरी उनाड वारा,
मी जेरबंद नाही!
का म्हणून वाकू मी?
का घालू मुजरा?
मी क्षुद्र नाही,
तुम्ही पंत नाही!
मी लहरी उनाड वारा,
मी जेरबंद नाही!
करून घ्या पाठीवर,
वार माझ्या आत्ता.
पण उद्या माफ करायला,
मी ही ‘संत नाही!
मी लहरी उनाड वारा,
मी जेरबंद नाही!
रिशी